• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Friday, November 6, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

खटाव माण अँग्रोच्या माध्यमातून औद्योगिरीकरणास बळकटी देणार – प्रभाकर घार्गे…..चौथ्या गळीत हंगामाचे रोलर पूजन संपन्न

माणगंगा by माणगंगा
August 12, 2022
in सातारा जिल्हा
0
खटाव माण अँग्रोच्या माध्यमातून औद्योगिरीकरणास बळकटी देणार – प्रभाकर घार्गे…..चौथ्या गळीत हंगामाचे रोलर पूजन संपन्न

खटाव माण अँग्रोच्या माध्यमातून औद्योगिरीकरणास बळकटी देणार – प्रभाकर घार्गे

चौथ्या गळीत हंगामाचे रोलर पूजन संपन्न

मायणी :- प्रतिनिधी

          खटाव माण तालुका ॲग्रो प्रो . प्रा . लि . पडळ या कारखान्याने प्रतिवर्षी आपल्या गाळण क्षमतेत सातत्याने वाढ केली असून उसास योग्य दर व शेतकऱ्यांची वेळेत ऊस बिलांची पूर्तता या बाबींमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा या कारखान्यावरील विश्वास वाढला आहे .साखर उत्पादन,मोलॅसिस,वीज निर्मिती,कंपोस्ट,मळी,बगॅस यासर्व निर्मितीसोबतच डिस्लेरी उभारणीचे उद्दिष्ट आम्ही हाती घेतलं असून खटाव माण अँग्रोच्या माध्यमातून खटाव तालुक्यात औद्योगिकीकरणास बळकटी देणार असल्याचा विश्वास कारखान्याचे चेअरमन व माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी खटाव – माण तालुका ॲग्रो प्रो . प्रा . लिमिटेड पडळ ता . खटाव या कारखान्याच्या चौथ्या गळीत हंगामाच्या रोलर पूजन समारंभाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केला.सदर वेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे ,हणमंत घोरपडे, संचालिका कु .प्रीती घार्गे ,विक्रम घोरपडे,महेश घार्गे ,अमोल पवार,अण्णासाहेब निकम, प्रकाश घार्गे, हरणाई सुतगिरणीचे संचालक मोहनराव देशमुख , किसन मोर्चा सातारा अध्यक्ष विकास गायकवाड,अजय सानप,पांडुरंग घोरपडे,राजेंद्र देशमुख,किसन जगदाळे,शिवाजी कदम,अशोक देशमुख,विलास शिंदे, तानाजी घाडगे,रवींद्र घोरपडे,गणेश निंबाळकर,काशिनाथ घाडगे,नेताजी भोसले,बबन घोरपडे,विनायक घोरपडे,हृषीकेश शिंदे,जनरल मॅनेजर अशोक नलावडे व परिसरातील गावो गावचे ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

    प्रभाकर घार्गे पुढे म्हणाले , दुष्काळी खटाव तालुक्यात कारखाना काढताना अनेक प्रश्न होते . मात्र या तालुक्यात विविध पाणी योजनांचे पाणी येणारच होते हे लक्षात घेऊन धाडसाने कारखाना उभारणीचे काम केले . कारखान्याच्या योग्य नियोजनामुळे कृतिशील टीममुळे प्रतिवर्षी अपेक्षेपेक्षा उसाचे उत्पादन सर्व कारखान्याची क्षमता प्रयत्नात ज्यादा निघाले . उसापासून अल्कोहोल , विज निर्मिती झाली तरच कारखान्यास नफा होतो . शासनाने यावर्षी १५० रुपये दर वाढवून दिला आहे . तो दर देण्याचा यावर्षी कारखान्यामार्फत प्रयत्न केला जाईल . १५ ऑक्टोबर पर्यंत बॉयलर प्रज्वलित करून लवकरच उसाच्या गळीपास प्रारंभ करणार आहोत . या परिसरात कारखाना झाल्यामुळे खटाव तालुक्यात १५ टक्के तर माण तालुक्यात २५ टक्के ऊस उत्पादनात वाढ झाली.लवकर ऊस गेल्यास रिकव्हरी चांगली मिळते बाब लक्षात घेऊन परिसरातील शेतकऱ्यांचा ऊस राहणार नाही कारखान्यामार्फत काळजी घेतली जाईल . सध्या तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज झाली असून यावर्षी साखरेचे चांगले उत्पादन होईल . कारखान्याच्या उत्कृष्ट कामामुळे जानेवारी २०२३ मध्ये कारखान्यास आयएसओ मानांकन मिळणार आहे .

     कारखान्याचे कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे यावेळी म्हणाले,कारखान्याच्या पहिल्या गळीचत हंगामा वेळी ऊस तोडणी , वाहतूक साठी अनंत अडचणी होत्या . मात्र , सर्व अडचणीवर मात करून कारखान्याची साखर उत्पादन क्षमता सातत्याने वाढविण्याच्या प्रयत्नात आम्ही यशस्वी झालो आहोत . गेल्या हंगामात कारखान्यातील जबाबदार व्यक्तीच्या गैरहजेरीत देखील गतवर्षी उसाचे गाळप चांगल्या प्रकारे झाले .याचे श्रेय कर्तव्यदक्ष प्रीतीताई घार्गे व विक्रम घोरपडे आणि सर्व संचालक ,सक्षम अधिकारी यांचेसह चेअरमन व कोचेअरमन यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे आहे. येत्या मार्चमध्ये शंभर केएलपीडी क्षमतेच्या डिस्टिलरी प्रकल्पाची चाचणी घेऊन सन २०२३ मध्ये सदर प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविला जाईल . 

     सदर वेळी रोलरचे पुजन करून मान्यवरांच्या हस्ते कारखाना मिशनरी जोडणीस सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनरल मॅनेजर अशोक नलावडे यांनी केले. तर उपस्थितांचे आभार विक्रम घोरपडे यांनी मानले.

चौकट :- 

            कारखान्याचा तिसरा चेअरमन प्रभाकर घार्गे,को चेअरमन मनोज घोरपडे,कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे व आणखी काही प्रमुखांच्या अनुउपस्थित पार पडला होता. प्रमुखांची गैरहजेरीत कारखान्याच्या भवितव्यावर अनेकांनी प्रश्नःचिन्ह उभा केले होते.परंतु माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या कन्या संचालिका कु.प्रीतीताई घार्गे व को चेअरमन मनोजदादा घोरपडे यांचे बंधू संचालक विक्रम घोरपडे यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या माध्यमातून कारखाना सर्व अडथळ्यांना पार करीत शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरला व विक्रमी आठ लाखांचे ऊस गाळप करण्याच्या आपल्या अग्नीपरीक्षेत पास झाला. याबद्दल या कार्यक्रमाच्या निम्मिताने सर्व संचालक व अधिकारीवर्गाचे उपस्थित सर्व मान्यवरांनी कौतुक केले.

फोटो- खटाव माण तालुका ॲग्रो कारखान्याच्या रोलर पूजन समारंभ प्रसंगी चेअरमन प्रभाकर घार्गे , कार्यकारी संचालक संग्राम घोरपडे , कु . प्रीती घार्गे , विक्रम घोरपडे , महेश घार्गे , प्रकाश घार्गे , मोहन देशमुख,अण्णासाहेब निकम उपस्थित मान्यवर .

Views: 1,155
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
तऱ्हाडी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा याची उद्घाटन प्रसंगी सरपंच जयश्री धनगर यांचे आवाहन

तऱ्हाडी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवा याची उद्घाटन प्रसंगी सरपंच जयश्री धनगर यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)