संत सेना महाराज पुण्यतिथीचे औचित्य साधून शुरवीर जीवा महाले चौकाचे नामकरण :
नातेपुते प्रतिनिधी :
दहिगाव ता.माळशिरस येथे श्री संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून दहिगाव येथील बसस्थानक चौकाचे शूरवीर जिवाजी महाले नामकरण यावेळी दहिगावचे सरपंच रणधीर पाटील, अरुण (तात्या) सावंत, शरद (बापू) मोरे, बाळासाहेब कदम,विजय पाटील, आजिनाथ शिरतोडे,सचिन पवार, नितीन मोरे या मान्यवरांसह समस्त ग्रामस्थ दहिगाव व नातेपुते परिसरातील नाभिक समाज बांधव यांच्या हस्ते फलकाचे पुजन करून श्रीफळ वाढवून अनावरण करण्यात आले, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाभिक समाज दहिगाव यांनी परीश्रम घेतले







