रयत शिक्षण संस्थेत सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेतात.स्व.कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या अथक प्रयत्नातून ही संस्था नावारुपाला आली आहे.वटवृक्ष हे या संस्थेचे प्रतिक आहे.रोपट्याचे वटवृक्ष करण्याचे काम या दोघांनी केले.दिनदुबळे,कष्टकरी,अनाथ,सर्वसामान्यांच्या मुलांना स्वतःचे दागिने विकून शिकवले.वेळप्रसंगी स्वतः उपाशी राहून स्व.आण्णा व वहिनींनी जेवण दिले.
परंतु सद्या आशिया खंडातील नावलौकीक असलेली रयत शिक्षण संस्था रयतेची नसल्याची चर्चा सर्वसामान्यांच्यातून होत आहे.नुकतेच दहिवडी काॅलेजच्या प्राचार्यांनी पालकांना खालच्या पातळीवर केलेले संभाषण ताजे असतानाच दहिवडी काॅलेजच्या ग्रंथालयाजवळ असलेल्या उतारामुळे पावसाचे पाणी रस्त्यावरच साचत आहे.
यामुळे काॅलेजच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांना विद्यार्थिनी वसतीगृहाच्या समोरील भिंतीवरून अथवा पाण्यातून मार्ग काढावा लागत आहे.दिः ०२/०७/२०२२ रोजी प्रेस संपादक व प्रेस सेवा संघाने काॅलेजच्या प्राचार्यांना पत्रव्यवहार करुन काॅलेजमधील विवीध विषयांच्या सुधारणेबाबत मागणी केली होती.परंतू आजअखेर याबाबत काॅलेज प्रशासनाने कोणताही निर्णय न घेता केराची टोपली दाखवली आहे.तरी काॅलेज प्रशासनाला जाग येऊन विद्याथ्यांची तारेवरची कसरत थांबणार का? याकडे विद्यार्थ्यांसह नागरीकांचे लक्ष लागले आहे.







