माणदेशातच कॉरिडॉर स्थापन होईल
-श्रीमती निर्मला सीतारामन
माणदेशातील सातारा, सांगली सोलापुर या तीन जिल्ह्याच्या सिमेवरील माण देशात म्हसवड, मासाळवाडी,धुळदेव,गारवड परिसरात केद्र सरकारने बंगळुरु इकोनॉमिक कॉरिडॉर स्थापन स्थापन करण्याबाबतची प्रशासकिय पातळीवरील कार्यवाही जलद गतीने पुर्ण करण्यासाठी राज्य सरकारला आदेश द्यावेत या कॉरिडॉर मध्ये गारवडचाही समावेश करावा या मागणीचे निवेदन केंद्रीय अर्थ व उद्योग मंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांना आज सकाळी नऊ वाजता इंदापुर येथे भेटून देण्यात आले.
म्हसवड कॉरिडॉर बाबतचे निवेदन देताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी श्रीमती निर्मला सीतारामन यांना म्हसवड कॉरिडॉर बाबतची माहिती दिली व हा कॉरिडॉर माणदेशातच स्थापन करण्याबाबतची विनंती करण्याचे आपणास हे निवेदन देण्यास आले असल्याची माहिती दिली.
म्हसवड धुळदेव गारवाड कॉरिडॉर बचाव समितीचे निमंत्रक धनंजय ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमती निर्मला सीतारामन यांना भेटलेल्या शिष्टमंडळात डॉ.महादेव कापसे,अॅड. सोमनाथ वाघमोडे, युवराज सुर्यवंशी,किशोर सुळ, भानुदास सालगुडे, शिवराज पुकळे,अजित बोरकर गणेश काटे,,रमेश पाटील, तुषार पाटील पत्रकार सलीमभाई पटेल आदींचा समावेश होता







