कोल्हापूर ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल)
दख्खनचा राजा श्री . जोतिबा देवाच्या नवरात्रोत्सवास धार्मिक उत्साहात प्रारंभ….. .पहिल्या माळेला जोतिबा देवाची नागवल्ली पानातील महापुजा बांधुन धुपारती सोहळ्याने घट बसविण्यात आले .
श्री . जोतिबा मंदिरात पहाटे ३ वाजता महाघंटेचा नाद करुन दरवाजे उघडण्यात आले .पहाटे ४ते ५ जोतिबा मूर्तीची पाद्य पुजा ‘ मुख मार्जन , काकड आरती झाली .पहाटे ५ते ६ पंचामृत महाभिषेक विधी झाला .६ वाजता घटस्थापने निमित्त नागवल्ली पानातील अलंकारी बैठी महापुजा बांधण्यात आली . ही पुजा प्रविण कापरे , अंकुश दादर्णे , अदिनाथ लादे, महादेव झूगर , बांळासााहेब साांगळे यांनी बांधली . पुजेसाठी खाऊ ची पाच हजार पाने खडकलाट ता .चिकोडी येथील भाविकांनी दिली .
जरबेरा फुलांची सजावट चव्हाण बंधु आष्टा ता .वाळवा यांनी केली. .सकाळी ९ वाजता घटस्थापनेसाठी श्रीःचे पुजारी ,उंट , घोडे , देव सेवक ,वाजंत्री च्या लवाजमास धुपारती सोहळा निघाला . देवस्थान समितीचे प्रभारी दिपक म्हेत्तर , सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टचे प्रभारी अजित झूगर, सरपंच राधा बुणे सहभागी झाले होते .यमाई ,तुकाई ,भावकाई मंदिरात घट बसविण्यात आले . माहिला वर्गानी पायावर पाणी घालून धुपारतीचे औक्षण केले . सुगंधी दुधाचे वाटप करण्यात आले .कर्पुरेश्वर तीर्थ कुंडात दिवा सोडण्याचा विधी झाला .दुपारी १ वाजता धुपारती जोतिबा मंदिरात आल्यावर तोफेची सलामी देऊन अंगारा वाटप केला . दरम्यान सिंघिया ग्वाल्हेर ट्रस्टचे कुलमुखत्यार यशवंत भोसळे यांनी श्री . क्षेत्र भेट देऊन सिंधिया ग्वाल्हेर ट्रस्टच्या वतीने देवास संपुर्ण पोषाख अर्पण केला . दुसऱ्या माळेला मंगळवारी या पोषाखामध्ये श्री जोतिबा देवाची महापुजा बांधली जाणार आहेत . या वेळी सिधिया घराण्याचे वंशपरंपरागत पुजारी समस्त मिटके ( केळीचा वाडा ) उपस्थित होते .
१)उपवासधारक संख्या वाढणार जोतिबाच्या नवरात्र उपवासाची सोमवारपासून सुरुवात होणार आहे .यंदाचे संपूर्ण नऊ दिवसाचे नवरात्र उपवास असल्याने नवीन उपवासधारकांची संख्या वाढणार आहे. दोनवेळा फराळ, अनवाणी, उपरणे-धोतराचा पेहराव, प्रवास कमी असे जोतिबा नवरात्र उपवासाचे स्वरुप असते.२)मंदिर खुले बंद व अभिषेक च्या वेळेत बदल .नवरात्रोत्सवात पहाटे ३ वाजता जोतिबा मंदिराचे दरवाजे उघडले जातात .रात्री १२ .३० वाजता बंद होतात . अभिषेक पहाटे पाच वाजता एखदाच होईल . इतर वेळी दोन वेळ अभिषेक होतो .३) धुपारती आणि तोफेच्या सलामी सलग दहा दिवस जोतिबा ते यमाई मंदिर मार्गावरून दररोज धुपारती सोहळा निघतो . नवरात्रोत्सवात एकूण १५ तोफे च्या सलामी होतात . ४) विविध रूपातील महापुजानवरात्रोत्सवात जोतिबा देवाची नागवेली पानातील , कमळपुष्पातील , श्रीकृष्ण रूपातील , अंबारीतील , गरुडारूढ रूपातील पुजा गावकरी पुजाऱ्या कडून बांधल्या जातात .