सातारा जिल्ह्यातील दुष्काळी असलेल्या माण तालुक्याचा विद्युत वितरण विभाग झोपेत असल्याचे दिसून येत आहे.तेथील अधिकारी व कर्मचारी सर्वसामान्य नागरीकांकडे जाणुनबुजून दुर्लक्ष करताना दिसतात.दहिवडीच्या जयवंत नगरमधील डीपी सह विवीध ठिकाणच्या डीपीला झाडाझुडपांचे जाळेच निर्माण झाले आहे.
कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यात मेळ नसतो,कर्मचारी अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत.आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर कर्मचारी वेळेवर न पोहचता कानाडोळा करतात.दहिवडीसह माण तालुका ग्रामीण भाग असल्याने या परीसरात शेती हा मुख्य व्यवसाय आहे.
तरी येथील शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीपुरवठा करताना विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने दिवसरात्र वाया घालवावा लागत आहे.याबाबत संबंधीत अधिकाऱ्यांना विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात.वेळोवेळी पत्रव्यवहार करुनही त्याला केराची टोपली दाखवली जात आहे.एखाद्या नागरीकाने घरातील विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधल्यास दोन-तीन दिवस कर्मचारी कानाडोळा करतात.हे सर्व प्रकरण पाहता आतातरी झोपलेल्या विद्युत वितरण विभागास जाग येणार का? हे पहावे लागेल.







