कोल्हापूर ( माणगंगा प्रतिनिधी कमल धडेल )
जोतिबाच्या जागरला भाविकांचा लोटला जनसागर . सातव्या माळेला जोतिबाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्या मधील महापुजा बांधली . करवीर संस्थान छत्रपती घराण्याकडून जागरानिमित्त जोतिबा पुजेसाठी महावस्त्रे अर्पण केली .
नवरात्रोत्सवाचा जोतिबा देवाचा जागर इतर देवदैवताच्या आधी साजरा होतो .रविवारी जागरा निमित्त श्री .जोतिबा देवाची चार मुक्तीचे प्रतिक दाखविणाऱ्या चौफुल्या मध्ये महापुजा अमर नवाळे, बाबासाहेब लादे,प्रविण भंडारे , दगडू भंडारे ,रमेश ठाकरे , नितीन लादे , सरदार सांगळे, अंकुश दादर्णे यांनी बांधली .पुजे पुढे उन्मेष नावाचा अश्व ( घोडा ) अर्पण केला . जागरा निमित्त पुजेसमोर आकर्षक फुलांची सजावट केली होती . मंदिराच्या दरवाज्यावर सीताफळ्, कवडांळ , बेल, फुलांचे तोरण बांधले .फलाहाराची पाच ताटाचा नैवेद्य वाजत गाजत यमाई मंदिराकडे नेण्यात आला. श्रीचे पुजारी ,देव सेवक, घोडे , वाजंत्री च्या लवाजम्यासह धुपारती सोहळा निघाला .जागरा निमित्त रात्रभर मंदिर दर्शनासाठी खुले होते . रविवारी पहाटे ३ पासुनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली . रविवारची सुट्टी आणि जोतिबाचा वार असल्याने भाविकांची प्रचंड गर्दी वाढली .वाहन पार्किंगवर वाहनाची मोठी रेलचेल होती . गायमख वळण मार्ग ते जोतिबा प्रवाशी कर नाक्यापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली .दोन कि.मी. अंतरापर्यंत वाहने थांबली होती . जोतिबा मंदिराचा मुख्य मार्ग भाविकांच्या गर्दीने गजबजून गेला होता . दर्शन रांग व्यवस्थेसाठी पोलिस , देवस्थान कर्मचारी मोठया संख्येने तैनात होता . नवीन बांधकाम सुरू असलेल्या दर्शन मंडप मध्ये भाविकांची दर्शन रांग लागली होती बसस्थानकावर प्रवाशी भाविकांची मोठी गर्दी होती . एस .टी. महामंडळाने जादा गाडयाची सोय केली होती. कर्नाटकातील ही एस .टी . गाडया जादा होत्या . चांगभलंच्या गजराने अवघा जोतिबा डोंगर दुमदुमून गेला . तेल, कडाकणी, ऊस अर्पण करण्यासाठी भाविकांची गर्दी झाली . मंदिरात भाविकांनी जागरा निमित्त आतषबाजी केली . भजन , डवरी गीताचा कार्यक्रम झाला .