मोठ्या उत्साहात म्हसवडचा पारंपारिक सिमोल्लंघन सोहळा संपन्न
म्हसवड,ता.5:अनेक राज्यांतील असंख्य भाविकांचे कुलदैवत व श्रध्दास्थान असलेले येथील श्री सिद्धनाथ व देवी जोगेश्वरीच्या मंदिरातील आज सायंकाळी विजया दशमी निमित्त पारंपारिक सिमोल्लंघनाचा सोहळा शाही पद्धतीने संपन्न करण्यात आला.

आज विजया दशमी निमित्त दुपारी तीन वाजता मंदिरातील श्रींच्या उत्सव मूर्ती मंदिराला प्रदक्षिणा घालून मुख्य पुजारी सालकरी यांच्या निवासस्थानी स्थानापन्न करण्यात आल्या. संध्याकाळी पाच वाजता, सालकऱ्यांच्या निवासस्थानातून मूर्ती आणून त्या सजवलेल्या पालखीत विराजमान करुन श्रींची आरती ,सालकरी, पुजारी, श्री नाथ मठाचे मठाधिपती, राजदंडधारी पुरोहीत, डवर वाजवणारे डवरी, ढोल वाजवणारे घडशी, सेवेकरी, भाविक हा सर्व लवाजमा मुख्य पेठेतून माणगंगा नदीच्या तिरावर जाऊन त्याठिकाणी तुळजा भवानी व रेणुका मातेची पालखी आल्यानंतर धार्मिक विधी उरकून “सोने लुटण्याचा” कार्यक्रम झाला.
त्यानंतर माणगंगा नदीपात्रानजिकच्या रसत्याने विठ्ठल मंदीर, बाजार पटांगण,बसस्थानक,चांदणी चौकातून या हि मिरणुक राज बागेतील श्री म्हातारदेव मंदीरात श्रीच्या भेटीस गेली त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र,रामुसवेशीतून मुख्य पेठेतून पुन्हा मंदिरात ही शिलंगण मिरवणूक मार्गस्थ झाली. या सिम्मोलंघन मिरवणुकीच्या पुढेमंदाराचे सालकरी,मानकरी सोबत हाती पेटत्या मशाली (दिवटी)घेऊन दुतर्फा मानकरी सहभागी झाले होते.
शिलंगनणावरून आलेल्या श्रींना पुजारी मंडळीच्या सवाष्णींनीऔक्षण करून, ओवाळून आशिर्वाद घेतले. तद्नंतर उत्सव मूर्ती सालकऱ्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आल्या.







