• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

विनायक मंडळाचे सामाजिक उपक्रम उल्लेखनीय – तहसीलदार किरण जमदाडे
प्रबोधनपर धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक

माणगंगा by माणगंगा
October 10, 2022
in सातारा जिल्हा
0
विनायक मंडळाचे सामाजिक उपक्रम उल्लेखनीय – तहसीलदार किरण जमदाडेप्रबोधनपर धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक

विनायक मंडळाचे सामाजिक उपक्रम उल्लेखनीय – तहसीलदार किरण जमदाडे
प्रबोधनपर धार्मिक व सामाजिक कार्याचे कौतुक

मायणी :- प्रतिनिधी


अंधारमय बनलेल्या आयुष्यात प्रकाश आणणारा सण म्हणजे नवरात्रोत्सव. आजच्या मोबाईलच्या जगात समाजभान लोक विसरून चालले आहेत. अशा वेळेत जीवघेण्या कोरोना परिस्थितीत उपासमार होणाऱ्यांची आई बनलेल्या व अनेक प्रबोधनपर धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम राबवित समाजाप्रती आपुलकी जपणाऱ्या विनायक दुर्गाउत्सव मंडळाचे सर्व उपक्रम उल्लेखनीय आहेत ,असे गौरवोद्गार खटाव तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे यांनी मायणी येथे काढले.


ते विनायक दुर्गाउत्सव क्रीडा व सांस्कृतिक मंडळ चांदणी चौक यांचेकडून आयोजित नवरात्रोत्सव २०२२ याठिकाणी दिलेल्या भेटीवेळी बोलत होते.यावेळी ह.भ.प.गणेश डांगे महाराज,तानाजी चव्हाण,खंडू लोहार,मंगेश गायकवाड,सचिन घाडगे,मनोज माने,अविनाश दगडे,विजय भोंगाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.


यावेळी मंडळाच्या विविध उपक्रमाची माहिती देताना दत्ता कोळी यांनी सांगितले की , यावर्षी समाजभान राखताना मंडळाच्या वतीने मायणी स्मशानभूमीत श्रमदान करून स्मशानभूमी स्वच्छता, चांद नदीकडे विधीसाठी जाणारा रस्त्याची साफसफाई, ग्रामस्थांची गैरसोय टाळण्यासाठी एक हजार लिटर क्षमतेची पाण्याची सिमेंट टाकी ठेवून, वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराचे वेळी सत्तर रक्तदात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

त्याचबरोबर लोकांना प्रबोधनपर धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना झी टॉकीज फेम रवी रेणके यांचा गोंधळी गीतांचा कार्यक्रम ,महिलावर्गासाठी हळदीकुंकू कार्यक्रम व ह.भ.प.गणेश डांगे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन व युवकांसाठी विनोदी कलाकार अनिकेत शिंदे उर्फ कार्टून आण्या यांचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.

तसेच गतकाळात कोरोना काळात खटाव तालुक्यातील पहिले अन्नछत्र उभारून शेकडो लोकांना उपासमारीपासून दिलासा देताना मायणी पक्षी आश्रयस्थान याठिकाणी तब्बल साठ दिवस श्रमदान करून पक्षी आश्रस्थानास गतवैभव मिळवण्यासाठी प्रयत्न केलं होते.यापुढेही अशा प्रकारे “मदत नव्हे कर्तव्य या भावनेतून आमचे मंडळ कार्यरत राहणार आहे,असेही त्यांनी सांगितले.


हे सर्व उपक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाच्या विष्णू माने,सुनील भोंगाळे,अक्षय दगडे,गणेश वाघ,अमित माने,स्वप्नील भोंगाळे,सचिन माने,महेश भोंगाळे,अजय दगडे,विक्रम माने,अनिकेत भोंगाळे,लक्ष्मण वाघमारे,परसु वाघमारे,दर्शन गायकवाड,सचिन वाघमारे,विशाल माने ,संदीप साळुंखे,सोमनाथ मोहिते या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमात रक्तदात्याना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊ करण्यात आले.यावेळी लोहार गुरुजी,चंद्रकांत भोंगाळे,अशोक माने,जालिंदर माळी,किरण भोंगाळे,पिलाजी दगडे आदीही या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व उपस्थितांचे आभार सोमनाथ चव्हाण यांनी केले.

चौकट :- अनाथालयास तहसीलदारांचा मदतीचा हात
विनायक मंडळाच्या वतीने आयोजित ह.भ.प.गणेश डांगे महाराज यांच्या कीर्तन कार्यक्रमादरम्यान डांगे महाराज यांच्या कडेगाव येथील अनाथाश्रमातील मुलांसाठी तहसीलदार किरण जमदाडे यांनी पुन्हा एकदा आता दानशूर स्वभाव दाखवताना आयुष्याचा संघर्ष व त्यातून तोलून सोखाऊन मिळालेले यश याच महत्व सांगताना दहा हजार रुपयांची मदत अनाथालयाला देऊ केली .या सोबतच मंडळाच्या वतीनेही अनाथालयाला शंभर किलो गहू सुपूर्द करण्यात आला.

Views: 258
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
भोरखेडा विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटप

भोरखेडा विद्यालयात राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त जंतनाशक गोळ्या वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)