• होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
Thursday, November 5, 2026
माणगंगा
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय
No Result
View All Result
माणगंगा न्युज पोर्टल
Home सातारा जिल्हा

राजकीयव्यासपीठावर होणारे तात्पुरते गुदगे-येळगावकर यांचे मनोमिलन सिद्धनाथ रथोत्सव धार्मिक कार्यक्रमात यंदातरी दिसणार का ? रिंगावण यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात सर्वपक्षीय एकतेची जनतेची मागणी

माणगंगा by माणगंगा
November 13, 2022
in सातारा जिल्हा
0
राजकीयव्यासपीठावर होणारे तात्पुरते गुदगे-येळगावकर यांचे मनोमिलन सिद्धनाथ रथोत्सव धार्मिक कार्यक्रमात यंदातरी दिसणार का ? रिंगावण यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात सर्वपक्षीय एकतेची जनतेची मागणी

राजकीयव्यासपीठावर होणारे तात्पुरते गुदगे-येळगावकर यांचे मनोमिलन सिद्धनाथ रथोत्सव धार्मिक कार्यक्रमात यंदातरी दिसणार का?

रिंगावण यात्रेतील धार्मिक कार्यक्रमात सर्वपक्षीय एकतेची जनतेची मागणी

मायणी दि११ :- प्रतिनिधी

               मायणी ,ता-खटाव सातारा जिल्ह्यातील अनेक चांगल्या वाईट कारणाने प्रसिद्ध असणारे धार्मिक,सामाजिक,राजकीय परंपरा व नावलौकिक असणारे गाव.या गावचे नाव चर्चला आले की,गुदगे-येळगावकर या दोन वेगवेगळ्या राजकीय गटांच्या राजकीय टशनची चर्चा जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रभर गाजली आहे. जिल्ह्यातील अनेक गावात राजकीयदृष्टया गटागटात टोकाचे शत्रुत्व असणारे नेते स्वतःच्या गावच्या यात्रा जत्रांच्या निम्मिताने गावच्या जनतेच्या खातीर आपआपसातील हेवेदावे गावच्या वेशीवर ठेऊन धार्मिक कार्यक्रमांना एकत्र येताना दिसतात.

               परंतु ,मायणीकर असणाऱ्या नेत्यांचा सूर काहीसा या उलट असलेला पहावयास मिळतो. गाव वेशीपासूनच्या बाहेरच्या परक्या नेत्यांसाठी राजकारणात वेळप्रसंगी सुरात सूर मिळणारे नेते गावच्या विविध यात्रांच्या निम्मिताने आपल्या गावातील जनतेसाठी एकत्र येण्याच्या वाटेवर बेसूर होऊन एकमेकांना टाळताना दिसतात.

               गावातील यशवंतबाबा देवस्थान व सिद्धनाथ देवस्थानावर जि प सदस्य सुरेंद्र गुदगे यांचे वर्चस्व दिसून येते.निश्चित त्यांनी या देवस्थानावर निधी मिळवून देऊन याठिकाणी सुशोभीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु या दोन्ही रथोत्सवासाठी त्यांचे कट्टर विरोधक डॉ.दिलीपराव येळगावकर व त्यांच्याशी फारकत घेतलेले सध्याचे गावाचे सरपंच सचिन गुदगे उपस्थित असलेले दिसून येत नाहीत. या दोन्ही यात्रांच्या वेळी गावात मानपान व  स्वतःचे वलय ठळक करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या राजकीय वातावरणात गावातील परिस्थिती गंभीर होऊन येथील परिस्थिती पोलिस यंत्रणेवर तान आणणारी ठरते.याची अनेक उदाहरणे मायणीच्या धार्मिक परंपरेला गालबोट लावणारी व सर्वसामान्य जनतेत भीती निर्माण करणारी ठरली आहेत. 

               तर गावातली संत सरुताई देवस्थानचे अध्यक्ष डॉ.दिलीपराव येळगावकर यांच्या विनंतीला मान करून या रथोत्सवास अनेक मंत्री,खासदार ,आमदार ,अधिकारी आलेले पहावयास मिळतात परंतु याच भागातील लोकप्रतिनिधी असणारे माजी जि.प.सदस्य सुरेंद्र गुदगे या ठिकाणी अनुपस्थित असलेले दिसतात. श्री.धनगर विठोबा देवस्थान याठिकानीही डॉ.येळगावकर यांची उपस्थिती ठळकपणे सतत दिसून येते. 

              शेजारील गावात धार्मिक कार्यक्रमांना दिसणारी राजकीय नेत्यांची एकी गावाला सुखावणारी ठरते.याप्रमाणे मायणी गावातील धार्मिक व संत परंपरेचा वारसा जपणाऱ्या गावात हे असणारे राजकीय वैरत्व धार्मिक कार्यक्रमांसाठी तात्पुरते का होईना गावाच्या समाधानासाठी संपुष्टात का येत नाही? हा सवाल जनतेतून नेत्यांना होत आहे.

               याउलट आपापल्या राजकीय आघाड्या सांभाळताना पक्षीय राजकारणात कित्येक वेळा गुदगे -येळगावकर यांचे नाविलाजाने का होईना पण आघाडी झालेली उदाहरणे आहेत.

               सन २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीवेळी तत्कालीन राष्ट्रवादी जिल्हाअध्यक्ष डॉ येळगावकर व तत्कालीन कॉग्रेस मध्ये असणारे सुरेंद्र गुदगे यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश आपापल्या पक्ष संघटनेस सांगून तत्कालीन माढा उमेदवार विजयसिह मोहिते पाटील यांना मतदान करण्यास सांगितले होते.

               सन.२०१९ विधानसभा निवडणूक ही तर न भुतों ना भविष्यते ठरून “आमचं ठरलंय” सारखी विशाल भाजप विरोधी सर्वपक्षीय महाआघाडी करणारी ठरली होती. या निवडणुकीत तर अनेक बैठका व जाहीर सभा व्यसपीठांवर डॉ.दिलीपराव येळगावकर व सुरेंद्र गुदगे यांची एकत्र उपस्थिती सर्वांचे लक्ष खेचून घेत  होती.

              अलीकडचे उदाहरण म्हणजे खटाव तालुका खरेदी विक्री संघात माजी आमदार प्रभाकर घार्गे यांनी सर्वपक्षीय मोट बांधत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी।पुढाकार घेतला.याठिकानीही सुरेंद्र गुदगे व डॉ.येळगावकर यांनी विरोध न दर्शवता आपापल्या प्रमुख कार्यकर्त्यांना तालुक्यावर संधी उपलब्ध करून दिली.

              यासर्वात गत काही वर्षांपूर्वी श्रीसंत सरुताई रथोत्सवाच्या निम्मिताने या ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून डॉ येळगावकारांनी देवस्थान कडून रथोत्सवाच्या प्रदिक्षणेदरम्यान गावात सुरेंद्र गुदगे यांचा सन्मान केला होता.यामुळे गावातील जनतेला हायसे वाटले होते.

              यामुळे राजकीय दृष्टया बेरजेच्या राजकारणात  डॉ.येळगावकर व सुरेंद्र गुदगे या पारंपरिक विरोधी नेत्यांत होणारी युती. यंदाच्या रिंगावन यात्रेच्या निम्मितांने दरवेळी गावात होणारे तणावाचे वातावरण टाळण्यासाठी व गावातील जनतेपुढे धार्मिक सलोखा राखण्यासाठी श्री सिद्धनाथ रथोत्सवात राजकारणाविरहित काही क्षण तरी एकत्र येणार का ते आता पहावे लागेल.

Views: 610
Share

Related Posts

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला
सातारा जिल्हा

तिरंगा चे महत्व पटवून देणारा पुरस्कार विजेता लघुपट ध्वज.. लवकरच आपल्या भेटीला

August 13, 2024
म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन
सातारा जिल्हा

म्हसवड येथे 12 जुलै रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी प्रणित यांचे वतीने रुद्र याग, पर्जन्य याग आयोजन

June 29, 2024
श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….
सातारा जिल्हा

श्री सत्यसाई सेवा संघटना व शिवने ग्रामपंचायतच्या वतीने गरोदर मातांना मोफत किटचे वाटप ….

March 13, 2024
कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे
सातारा जिल्हा

कराड मधील माऊली व्हाट्सएप ग्रुप चा दशकोत्सव स्नेहमेळावा उत्साहात साजरासंवाद वाढला तरच सामाजिक वातावरण व्यवस्थित राहील-अनिल देशपांडे

January 16, 2024
राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.
सातारा जिल्हा

राष्ट्रनिर्मितीसाठी थोर पुरुषांचे विचार महत्वाचेप्रा. बालाजी वाघमोडे यांचे प्रतिपादन.

January 10, 2024
बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत
सातारा जिल्हा

बसपाच्या जिल्हा प्रभारीपदी किरण सावंत

January 9, 2024
Next Post
पिंपरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूराव सलगर यांचा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

पिंपरीतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक बापूराव सलगर यांचा जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने सत्कार समारंभ संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

श्रेणीनुसार बातम्या

  • Uncategorized
  • आरोग्य
  • कोल्हापूर
  • क्रीडा
  • देश-विदेश
  • पुणे
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • संपादकीय
  • सांगली
  • सातारा जिल्हा
  • सामाजिक

ताज्या बातम्या

  • test
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • मंत्रालयातील सेवेचा ध्यास आणि मातीशी घट्ट नातं: श्री. निलेश जाधव यांचा स्पृहणीय प्रवास..!
  • : ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना सनकोटचे वाटप; रामकृष्ण मेडिकल फाउंडेशन व इंडियन असोसिएशन ऑफ पुणे यांचा स्तुत्य उपक्रम

Total Visitors

hit counter
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)

No Result
View All Result
  • होम
  • सातारा जिल्हा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • कोल्हापूर
  • पुणे
  • सांगली
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • आर्थिक
  • सामाजिक
  • आरोग्य
  • संपादकीय

© 2021 माणगंगा न्युज पोर्टल. Website Designed By SuMoGa (Phone: 8485000137)