ऊस, रब्बी आणि खरीप पिकांच्या उत्पादक शेतकऱ्यांचे महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे तसेच शहरी भागातील गुंटेवारी भागात कोणत्याही भेदभाव न करता सरसकट मदत जाहीर करा.
वंचित बहुजन आघाडीची मागणी
सांगली
दि. ५ ऑगस्ट २०२१
महाराष्ट्रात झालेल्या महापुरामुळे अनेक नागरिक व शेतकरी विस्थापित झाले असून त्यांना सरकारतर्फे तातडीने मदत व पुनर्वसन आवश्यक आहे. जुलै २०२१ मध्ये या वर्षी दोन दिवसांमध्ये साधारण १६०० मि. मि. इतका पाऊस पडला म्हणजे वर्षभरात पडणाऱ्या पावसाच्या किमान ९०% पाऊस पडला त्यामुळे दरड कोसळणे, शेतजमीन खरडून जाणे आणि उभी पिके सुद्धा वाहून गेली असे विदारक चित्र आपल्या समोर आहे. शेतकऱ्यांच्या शेतात आता अक्षरशः दगड गोटे शिल्लक राहिली आहेत. पशुधन देखील मृतप्राय झाले आहे. आता सदरची जमीन बनवण्यासाठी शेतात बाहेरून माती विकत आणून त्यांना शेती करावी लागेल असे चित्र आहे.
विशेषत भूमिहीन, मागासवर्गीय अल्पभूधारक यात सर्वाधिक भरडल्या गेले, लहान बालके आणि महिलांच्या अडचणीची मोजदाद नाही.
मागण्या पुढीप्रमाणे,
१) ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पश्चिम महाराष्ट्रात तसेच मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भात अतोनात नुकसान झाले आहे. शेतातला ऊस अक्षरशः ऊस जमीनदोस्त झाला आहे त्यामुळे संबंधित शेतकरी हा ज्या साखर कारखान्याचा सभासद व करार धारक शेतकरी आहे त्या साखर कारखान्याने मागील वर्षीच्या बीलच्या प्रमाणात शेतकऱ्यांना उसाची मूल्य भरपाई द्यावी तशी तरतुद महाराष्ट्र शासनाने कारखानदारांना करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढावा. त्याशिवाय त्या कारखानदारांना परवानगी देऊ नये. त्याचप्रमाणे कारखान्याच्या माध्यमातून निर्माण झालेले अनेक उप पदार्थ निर्मिती, सह ऊर्जा प्रकल्प, मळी स्पिरीट उत्पादन ऑक्सिजन प्लाट, सॅनिटायजर प्लांट यातून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी.
२) कापूस, सोयाबीन आणि डाळ व फळे आणि भाज्या उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान महापुरात झालेल्या नुकसानी बाबत, सरकार सरकारी निकषानुसार केली जाणारी मदत तुटपुंजी आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या एकरी उत्पादन होणाऱ्या पिकाचे बाजारी मूल्य भरपाई म्हणून शेतकऱ्याला मिळावे. नुकसानीमुळे दुबार पेरणी करणे शेतकऱ्याला आर्थिक दृष्ट्या परवडणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना बाजार भाव प्रमाणे झालेल्या नुकसान भरपाई ची मदत करावी म्हणजे सरसकट मदत करावी.
३) कम्युनिटी किचन सुरू करावे व पूरग्रस्त भागातील वीज वसुली थांबवावी.
४) गुरासाठी आवश्यक चारा व त्यांच्या आरोग्यासाठी गुरांचे लसीकरण करावे.
५) महापूर नुकसानग्रस्त भागात शेतकऱ्यांना १००% कर्जमाफी व दुबार लागवडीसाठी शेतकऱ्यांना मोफत बियाणे आणि खते बांधावर देण्यात यावे.
६) अतिशय महत्वाचे म्हणजे पूरग्रस्तांची ओळखपत्र आवश्यक सर्व कागदपत्र सगळ बुडालं आहे. लोकांकडे ओळखपत्र राहिलेली नाही. शासकीय मदत असो किंवा काहीही गरज लागली तर ओळखपत्र लागतात. त्यामुळे शासनाने ओळखपत्र देणं आवश्यक आहे नाही तर पुन्हा तहसीदारां कडे फेऱ्या माराव्या लागतील त्यामुळे आधार कार्ड, रेशन कार्ड, सात बारा तात्काळ खूप ताटकळत न ठेवता कसा देता येईल, यासाठी कॅम्प लावता येईल अशी सोय झाली पाहिजे.त्याबरोबरच शहरातील पुरग्रस्त गुंठेवारी भागात कोणत्याही भेदभाव न करता सरसकट मदत जाहीर करावी.
असे एकूण १२ मागण्यांच निवेदन आज सांगली जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी वंचित बहुजन आघाडी चे सांगली जिल्हाध्यक्ष (दक्षिण) महावीर कांबळे, जिल्हा सचिव उमर फारूक ककमरी, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, जिल्हा संघटक संजय कांबळे, मनपा क्षेत्र अध्यक्ष प्रशांत कदम, वसंत भोसले, अनिल अकलखोपे, अनिल मोरे,प्रशांत वाघमारे,अशोक लोंढे, मिलिंद कांबळे, सागर आठवले, विशाल धेंडे, सतीश शिकलगार, परशुराम कांबळे, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते.