लोणारी दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार
दहिवडी प्रतिनिधी :
संपूर्ण महाराष्ट्रात चे आराध्य दैवत असणारे जागृत देवस्थान भोजलींग गड येथे लोणारी युवा प्रतीष्टान दिनदर्शिका प्रकाशन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला
या वेळी लोणारी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष ,कृतिशील शिक्षक दैवत काळेल सर यांनी अतिशय मेहनत करून लोणारी दिनदर्शिका उत्कृष्ट रित्या तयार केली आहे
. लोणारी समाज हा महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात विभागला असून संपूर्ण भारतात वेगवेगळ्या राज्यात आहे याचा सर्वांगीण विकास व समाज समृद्ध करणे हे लोणारी प्रतिष्टान चे उद्धिष्ट आहे शिवाय समाजाचे देणं म्हणून शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये या साठी वेळोवेळी लोणारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून सहकार्य व मदत केली जाते प्रतिष्ठान च्या माध्यमातून
वंचित घटकांस न्याय व मदत,सहकार्य हे पुढे निरंतर सुरूच राहील अशी ग्वाही दैवत काळेल सर यांनी दिली कार्यक्रमास समाजातील सर्व स्तरातून लोक उपस्थित होते. समाज एकसंघ राहावा व त्याचा विकास व्हावा या साठी सर्वानी एकत्र व प्रयत्नशील राहावे असे मत श्री शिवाजी शिंदेयांनी व्यक्त केले .
यावेळी समाज घटक व प्रकाशन सोहळ्याचे साक्षीदार म्हणून शिवाजी शिंदे, सुभाष नरळे सर ,दैवत काळेल सर ,,आण्णा काळेल साहेबव इतर समाज बांधव उपस्थित होते







