निंबवडे गावचे पोस्टमन चाच्या 42 वर्षानंतर सेवानिवृत्त
निंबवडे ता. आटपाडी गावाचे चाच्या युनुस रसूल तांबोळी हे 42 वर्षे पोस्टामध्ये सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या निमित्ताने पोस्ट ऑफिस चे वरिष्ठ अधिकारी यांनी पती पत्नी सह सत्कार केला ,आज जरी पोस्ट खात्याचे महत्व मोबाईल मुळे कमी झाले असले तरी पूर्वी चे पोस्टमन ला गावचे किंमत होती .
इंनुस रसूल तांबोळी यांनी सन 1981 साली पोस्ट ऑफिस मध्ये रनर म्हणून कामाला लागले तेव्हा पासून सुरुवात केली .पोस्टमन पोस्ट मास्तर पर्यंत काम करून ऐक वेगळा ठसा निर्माण केला ,या कालावधीत या पंच क्रोशितील प्रत्येक माणूस कुठे आहे याची जाण व माहिती त्याचे कडे मिळायची शासकीय कामानिमित्त कोणीही शासकीय अधिकारी निंबावडे गावात आला तर तो प्रथम याचे कडे माहिती साठी यायचे.
अशा पद्धतीने अगदी शासनाचा दुत म्हणून त्यांनी आपली सेवा बजावली 42 वर्षाचे कालावधीत कामात कुचार पणा केला म्हणून कसलीही दंड अगर शिक्षा झाली नाही काल आटपाडी येथे पोस्ट खतेची वरिष्ठ अशिकरी ,गावचे ग्रामस्थ यांनी त्याचे सेवानिवृत्ती बद्दल सत्कार करून भावी आयुष्य साठी शुभेच्छा दिल्या.