आटपाडी तालुक्यात अवैध मटका जोमात …..
ओपन खाऊ देईना… क्लोज झोपू देईना शेकडो युवक देशोधडीला
आटपाडी प्रतिनिधी
ओपन खाऊ देईना……क्लोज झोपू देईना….अशी अवस्था मटक्याच्या आहारी गेलेल्या सर्वसामान्य व विशेष करून तरूण युवा वर्गाची झाली असुन कर्जबाजारी पणामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे चित्र आहे.
मटका बुकी तर सर्वसामान्य व तरूण युवक मटक्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी होऊन बेहाल झाले असल्याची अवस्था सर्वत्र पहायला मिळत आहे.
या मटक्याला खुलेआम चालविण्यासाठी अभय कोणाचे आहे …? हा प्रश्न सर्वांनाच सतावत आहे.जर जनतेचे रक्षकच भक्षक बनायला लागले तर सर्वसामान्य जनतेने विश्वास ठेवायचा कोणावर…? असा प्रश्न तालुक्यातील जनतेला पडला असल्याने याबाबत तक्रार करायची कुणाकडे..? हाच प्रश्न सर्वसामान्य नागरीकाला सध्या सतावत आहे.
अनेक दिवसापासुन खुलेआम चालु असलेला कल्याण मटक्याने मोठ्या प्रमाणात जोर धरून धुमाकुळ घातला आहे.कष्ट न करता झटपट श्रीमंत होण्याच्या नादात तालुक्यातील तरूण व युवा वर्ग या वाममार्गाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसुन येत आहे.
अवैद्य मटक्याच्या नादी लागुन अनेकांचे संसार उघड्यावर आले असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर मटका बुकी चालक मात्र गबरगंड झाल्याचेही चित्र पहायला मिळत आहे.
बादशहा खाऊ देईना…..आणी …राणी झोपू देईना अशी स्थिती मटक्याचे नादी लागुन व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या अनेक तरूण व युवक वर्गाची झालेली पहायला मिळत आहे..या मटक्याच्या नादी लागुन अनेकांनी आपले अख्खे संसार उधवस्त करून घेतले असुन,कर्जबाजारी होऊन दारू सारख्या व्यसनांच्या आहारी गेले आहेत. बहुतांश युवक व तरून वर्ग बरबादीकडे वळताना दिसत आहे.
खुलेआम दिवस – रात्री मटका बुकी चालु आहेत. यामध्ये दिवसाला लाखो रूपयांची अवैद्य उलाढाल होत आहे.परंतु हे अवैद्य व्यवसाय पोलिसांच्या नजरेस अजिबात पडत नाहीत. पोलीस सुद्धा लक्ष देत नाहीत. असे असल्याने सर्वसामान्य नागरीक या विषयापासुन चार हात लांब राहणेच पसंद करत आहेत.या झंजटीत पडायलाच नको असे म्हणून प्रत्येकजण गप्प बसने पसंत करत आहेत.
अवैध धंद्याविरोधात कारवाईबाबत पोलीस खात्याची भुमिका संशयास्पद असल्याने जनतेने भरवसा ठेवायचा कोणावर..? असा सुर सध्या नागरिकांमधून निघत आहे.
पोलिसांनी मनावर घेतल्यास एक तासात तालुक्यातील सर्व अवैद्य धंदे हद्दपार होऊ शकतील. परंतु कडक कारवाईची भुमिका पोलिस खात्याने स्विकारणे गरजेचे आहे. पोलिस खाते ठाम असणे गरजेचे आहे.परंतु पोलिस खात्याकडुन अशा अवैध धंदेवाल्यावर कारवाई का केली जात नाही…? हा गंभीर प्रश्न आहे.
पोलिस खाते सुद्धा या दोन नंबर मटका, झुगारला घाबरत आहे की काय..? अशी चर्चा सध्या तालुकाभर रंगत असुन नक्की कुणाच्या आशिर्वादाने काळे धंदे सुरू आहेत याचा उलगडा जनतेला होणे गरजेचे आहे.
चौकट
मटक्यावर पोलिसांची कारवाई म्हणजे मी मारल्यागत करतो आणि तू रडल्यागत कर अशीच अवस्था सुरू आहे. राजरोसपणे मटका घेतला जातो. मटका खेळला जातो, हे सर्व पोलिसांना माहिती असून सुद्धा पोलीस जाणून-बुजून याकडे कानाडोळा करीत आहेत . पोलीस या गोष्टीकडे दुर्लक्ष का करतात हेच जनतेला अजून समजले नाही.