सांगली जिल्हा आटपाडी खानापूर वाझर मधून दोन तरुणांची भरारी !
सांगली ; खानापूर तालुक्यातील वाझर एक गाव या गावामधील 2 तरुणांची यशोगाथा पहा !
भारत हा खेड्यांचा देश.खेडी सुधारली तर देश सुधारेल हे तत्व स्वातंत्र्य पूर्वकाळात गांधीजींनी जनमाणसात रुजवले.खेडी सुधरा, खेड्याचा सर्वांगीण विकास करा असा संदेश आपल्या कृतीतूनही त्यांनी दिला. देशाला स्वातंत्र्य मिळून 74 वर्षे झाली. चौर्य्हत्तर वर्षात देशाचा विकास पाहता खेडी ओस पडायला लागली.लोकसंख्येचे केंद्रीकरण शहरात होऊ लागले.
खेड्यापाड्यातील मुलांना मार्गदर्शनाअभावी दारिद्र्याच्या अज्ञानाच्या गर्तेतच आपले जीवन संपवावे लागले.अशी विचित्र परिस्थिती देशात असलेनेआर्थिक विषमता वाढत गेली त्यामुळे बेरोजगारीत अधिक भर पडली. पंधरा कोटी पेक्षा जास्त तरूण आज बेरोजगारीच्या खाईत ढकलले गेले आहेत.तरीही खेड्यापाड्यात राहून आयुष्य म्हणजे काय ते समजावून घेऊन चिकाटीने घरी कोणत्याही प्रकारचा परंपरेचा वारसा नसताना,वेगळी वाट चोखाळणारी तरूणाई पाहिली की मन थक्क होते.
खेडे गावातील काही मुलं जीवनाच्या क्षेत्रांमध्ये संघर्ष करत वेगळी वाट चोखाळत जेव्हा आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन आपले वेगळेपण दाखवतात तेव्हा आशादायी चित्र आपल्याला पाहायला मिळते.असेच सांगली जिल्ह्यातील चित्रपट,नाटक या क्षेत्रात दमदारपणे काम करणारे दोन तरुण खानापूर तालुक्यातील वाझर मधून पुढे आले आहेत.पुणे विद्यापीठातून इंडियन फिल्म स्टडीज हा पदव्युत्तर अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करून चित्रपट क्षेत्रात आपले नशीब आजमावणारा तो तरुण म्हणजे विक्रम मारुती शिरतोडे . वयाच्या केवळ 24 व्या वर्षी स्वतःच्या प्रतिभेच्या जोरावर त्यांने झी मराठी सारख्या नामांकित चॅनेल वरती स्थान मिळवले आहे
आणि उद्या 23 ऑगस्ट पासून झी मराठी या नामांकित टी.व्ही.चॅनेलवर सोमवार ते शनिवार अखेर दररोज सायंकाळी सात वाजता एक नवीन कौटुंबिक मालिका सुरू होत आहे. सदरची मालिका वाघोबा प्रॉडक्शन निर्मित असून या मालिकेसाठी चे संवाद लेखन सांगली जिल्ह्यातील वाझर तालुका खानापूर येथील विक्रम मारुती शिरतोडे यांनी केले असून तो सामाजीक कार्यकर्ते, पुरोगामी चळवळीतील मारुती शिरतोडे यांचा मुलगा असून त्याने पुणे विद्यापीठातून इंडियन फिल्म स्टडीज हा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे.सध्या तो झी मराठी वर ‘मन झालं बाजींद’ साठीचे संवाद लेखन करीत आहे. वाझर सारख्या खेडेगावातून येऊन कौतुकास्पद भरारी मारणारा विक्रम याचा प्रवास ही समाज परिवर्तन चळवळीतून झाला आहे.
मन झालं बाजींद या सुरू होणाऱ्या नवीन मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनेता वैभव चव्हाण व अभिनेत्री श्वेता राजन असून गाजलेल्या सैराट चित्रपटातील महत्त्वाची जोडी सल्या व बाळ्या म्हणजेच तानाजी गलगुंडे आज अरबाज शेख हे आहेत. तसेच चांडाळ चौकडी च्या करामती या वेब सिरीज मधील बाळासाहेबांची भूमिका करणारे अभिनेते भरत शिंदे व रामभाऊ ची भूमिका करणारे अभिनेते रामभाऊ जगताप या मालिकेमध्ये असणार आहेत. ही मालिकेची निर्मीती अभिनेते तेजपाल वाघ यांची असून ‘लागिर झालं जी’,कारभारी लय भारी यानंतरची येत असलेली ‘मन झालं बाजींद’ची ते निर्मिती करीत आहेत.
संवाद लेखक विक्रम मारुती शिरतोडे याच्या संवाद लेखणीतून साकारत ही मालिका एक नवा आयाम देईल याबद्दल विक्रमचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.