जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / नाेकरी (जाॅब) सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार*, महाराष्ट, व्हाटसअप – ९७६८४२५७५७
पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त केली आहे. त्यांच्यावर मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हाही नोंदवण्यात आला होता.
‘फेमा’ कायद्यांतर्गत त्यांची चौकशी सुरु आहे. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे.
फेमा कायद्याबद्दल : फेमा म्हणजे (foreign exchange management act) परकीय चलन संबंधित कायदा.
भारतीय परदेशी बाजारातील विकास आणि देखभाल व्यवस्थित होण्यासाठी या कायद्याची मदत होते.
या कायद्याअंतर्गत विविध देशांमधील नागरिकांमध्ये वस्तू सेवा आणि मालमत्तांमध्ये केलेल्या व्यवहाराची नोंद ठेवली जाते.
फेमा कायद्यांतर्गत संबंधित व्यक्तीच्या देशी आणि विदेशी मालमत्ता जप्त करता येतात.
कुठे लागू होतो हा कायदा ?
1) परकीय चलन
2) परदेशी सुरक्षा
3) कोणत्याही वस्तू किंवा सेवेची भारताबाहेरील निर्यात
4) कोणत्याही वस्तू किंवा सेवेची भारताबाहेरील आयात
5) सार्वजनिक कर्ज अधिनियम 1994 अन्वय परिभाषित केलेले सुरक्षा.
6) खरेदी विक्री आणि देवाणघेवाण
7) NRI च्या मालकीची कोणतीही परदेशी कंपनी.
8) भारतातील कोणताही नागरिक देशातील किंवा बाहेरील रहिवासी.
9) बँकिंग आर्थिक आणि विमा सेवा
हा कायदा संपूर्ण देशा मध्ये आणि देशाबाहेर असलेल्या परंतु भारतीय नागरिकाकडून व्यवस्थापित केल्या जात असलेल्या कार्यालयांना लागू होतो.
भारतीय चलन व्यवस्थापन कायद्याचे मुख्य कार्यालय न्यू दिल्ली मध्ये आहे. यालाच enforcement directorate म्हणजेच अंमलबजावणी संचालनालय असे देखील म्हणतात.