अभय जगताप यांच्या कामाचे आरोग्य मंत्र्याकडून कौतुक
- कोरोना काळात केलेल्या कामाचा राजेश टोपे यांच्याकडून गौरव
वरकुटे – मलवडी / वार्ताहर
कोरोना वैश्विक संकटात अनेकांनी मदतीचा हात पुढे केले . संपूर्ण देशात लाँकडाऊनच्या काळात वरकुटे - मलवडी परिसरात माणदेश फाऊंडेशन संचलित संकल्प कोरोना सेंटरच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली . त्यामध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप सातत्याने अग्रभागी होते आणि आजही ते काम करीत आहेत. त्यांच्या कामाची दस्तुरखुद्द राज्याचे आरोग्य मंत्री ना. राजेश टोपे यांनी दखल घेतली आहे. अभय जगताप यांनी केलेल्या कामाची ना.टोपे यांनी कौतुक केले. यापुढेही ते असंच काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूंचे संक्रमण वाढण्यास सुरुवात झाली. या आजाराचा फैलाव सर्वत्र होऊ नये म्हणून सरकारने लाँकडाऊन केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद करण्यात आले होते. या कालावधी मध्ये डॉक्टर , परिचारिका यांच्या बरोबरच पोलीस आणि सफाई कामगारांनी मोठ्या प्रमाणात काम केले . विशेष करून पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून खडा पहारा दिला. कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी प्रयत्न केले, अभय जगताप यांनी सामाजिक बांधिलकी जपत वरकुटे - मलवडी येथील यशवंतराव चव्हाण हायस्कूल मध्ये संकल्प कोरोना सेंटर सुरू केले. त्यामुळे वरकुटे - मलवडी परिसरातील रुग्णांना संजीवनी ठरली होती.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभय जगताप यांच्या माध्यमातून माजी सनदी अधिकारी श्री. प्रभाकर देशमुख साहेब , मुंबई विभागाचे आयकर आयुक्त डॉ नितीन वाघमोडे साहेब व मुंबई येथील प्रसिद्ध काँन्ट्रक्टर हणमंत शेठ जगताप व सरपंच बाळकृष्ण जगताप यांच्या नेतृत्वाखाली तसेच मार्गदर्शनातून व माण तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय जगताप सर , महाबळेश्वरवाडी चे माजी सरपंच विजय जगताप , सामाजिक कार्यकर्ते धिरज जगताप , बाळासाहेब आटपाडकर ( मिस्त्री ) या मित्रांच्या सहकार्याने कोरोनाग्रस्थांची होणारी फरफट थांबवण्यासाठी वरकुटे - मलवडी गावात ७ आँक्सिजन बेड सहीत ६० बेडचे सुसज्ज असे कोरोना सेंटर सुरू केले होते. यामध्ये कुकुडवाड गटासह मायणी परिसरातील कोरोना पाँझिटीव्ह रुग्णांनी उपचार घेतले आहेत.
गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणुच्या फैलावाने जगभर हाहाकार माजला आहे. या वावटळीत वरकुटे - मलवडी परिसर सुध्दा सापडला होता. अभय जगताप यांनी संकल्प कोरोना सेंटर मध्ये कोरोना रुग्णांना सेवा देणारे डॉक्टर , आरोग्य कर्मचारी , मेडिकल कर्मचारी , सहकारी मित्र , देणगीदार यांच्यासह जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शौर्य दाखविताना न थकता हे काम सुरु ठेवल्याबद्दल आरोग्य मंत्र्यांनी त्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
माण तालुक्यातील वरकुटे - मलवडी परिसरात आजही दुर्गम भागात कोरोना कमी झाला नाही. कोरोना ने अनेकांचा रोजगार कमी हिरावून नेला आहे. यासाठी अभय जगताप यांनी कर्मभूमीत मित्र परिवाराच्या सहकार्याने कोरोना सेंटर सूरु करून अनेकांना जीवदान दिले आहे. कोरोना रुग्णांवर योग्य पध्दतीने उपचार व्हावेत यासाठी प्रयत्न केले. या कोरोना सेंटरमध्ये भोजनासह सर्व उपचार मोफत केले आहेत. उद्योजक हणमंत जगताप शेठ व सरपंच बाळकृष्ण जगताप यांनी सुरूवातीपासून प्रत्येक रुग्णांना मोफत भोजन दिले आहे.
या सेंटरमध्ये येणाऱ्या प्रत्येक रुग्णांना बेड उपलब्ध करून दिली आहेत. डॉक्टरांशी समन्वय साधून जास्तीत जास्त रूग्णांना उपचार देण्याच्या अनुषंगाने जगताप यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. रक्तदान शिबिर भरवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे राज्याचे आरोग्य मंत्री ना.राजेश टोपे यांनी अभय जगताप व सहकारी मित्रांच्या कार्याचे कौतुक केले