” चार फोटोग्राफर्सच्या कारचा चक्काचुर पुणे शहरातील घटना प्री वेडिंग करुन पनवेलला परततांना अपघात !
पुणे ;
पनवेल
फोटोग्राफीक संघटना व तिच्या एकजुटीची सफल कहाणी
22 ऑक्टो 2021 पनवेलचे चार फोटोग्राफर्स उरुळी देवाची पुणे शहर येथे प्री-वेडिंग साठी येतात व शुट करुन दुपारी परतीच्या प्रवासाला कारने निघतात व दुपारी 1 वाजेच्या दरम्यान कारचा मोठा अपघात होतो, कार एका मोठ्या गाडीवर जोरात आढळते व सर्वत्र हल्लाबोल होतो, कार मधिल लोकांचे काय झाले असेल कोण जिवंत असेल ? असे कार बघुन कोणी ही बोलेल…..पण नशिब बल्ल्वतर चार पैकी दोन जख्मी फोटोग्राफर्स हडपसर पुणे येथिल लाईल लाईन हंस्पिटलला उपचारासाठी स्थानिक लोकांनी पाठवले पण मदतीला जवळचे व परिचित कोणीच नाही
अपघात दुपारी 1 वाजता झाल्यापासून पुणे शहरातुन काही फोटोग्राफर्सकडून मदत मागितली गेली पण पुणे शहरातून कोणीही रात्री 9 वाजे पर्यंत पोहचले नाही, कारण ओळखीचे व संघटनेचे कोणी नव्हते.
त्यानंतर पिंपरी व भोसरी फोटोग्राफर्स असोशिऐशनचे अध्यक्ष कमलेश सिनालकर यांनी सुनील जाधव व प्रदिप पाटिलसर यांचा नंबर दिला व तसे कळवले त्यांनंतर पुणे हडपसर परिसर फोटोग्राफर्स असोशिऐशन पदाधिकारी यांनी तात्काळ सुत्रे हलवली आणि तात्काळ अपघातग्रस्त फोटोग्राफर्सना मदत मिळवून दिली त्या कार मधिल फोटोग्राफर प्रविण पवार (रा.पनवेल) यांच्याशी संपर्क झाला ते केवळ कार मधिल एअरबॅग मुळे वाचले होते.
सुनील जाधव यांना कमलेश सिनालकर यांनी रात्री 9.30pm संपर्क करुन सदर घटना सांगितली मी तात्काळ पुणे फोटो फिल्म Whatsapp ग्रुपवर माहिती दिली व प्रदिप आर्ट स्टूडियोचे मालक दिपक सर यांना कॉल केला त्यांनी प्रदिप पाटिल सर शी संपर्क केला नंतर संजय ओस्वाल यांनी तात्काळ पोलिस स्टेशन उरुळी देवाची पुणे येथे जाऊन पुढील मदत केली आणि सर्व चार ही अपघातग्रस्त फोटोग्राफर्सना धीर दिला चहा बिस्किट जेवन दिले यासाठी त्यांचे सोबत मदतील संघटनेच अक्षय पवार रात्रभर होते…त्यांनंतर रात्री 1 वाजता सर्व फोटेग्राफर्स उपचार घेऊन व अपघातग्रस्त कार पोलिस स्टेशनला ठेवून पुढील कायदेशिर कारवाहीसाठी सोडून निर्धास्तपणे पनवेलला रवाना झालेत,
वरील सर्व मदत फक्त फोटोग्राफीक संघटनेमुळेच शक्य झाली आहे आणि हे पनवेल येथिल अपघातग्रस्त फोटोग्राफर्सनी सर्वाचे आभार माणून सांगितले.
सदर अपघातग्रस्त फोटोग्राफर्सना मोलाची मदत पुणे हडपसर परिसर फोटोग्राफर्स संघटना व पिंपरी भोसरी फोटोग्राफर्स संघटना यांनी केली.
मोलाचे सहकार्य
1) कमलेश सिनालकर अध्यक्ष
2) प्रदिप पाटिल अध्यक्ष
3) संजय ओसवाल, अध्यक्ष
4) दिपक आर्ट दिपक सर
5) अक्षय पवार कलाविश्व फोटो
6) माधवमामा चैत्राली फोटो
7) श्री दंडवते मेकअप आर्टिस्ट
8) दोन निनावी फोटोग्राफर्स
संघटना होती म्हणून संपर्कात आल्याक्षणी अपघातग्रस्त फोटोग्राफरला मदत मिळाली, एकीचे बळ मिळते