फुले एज्युकेशन च्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास उदगीर चे लेखक संपादक भेंडेगावकर यांनी आवर्जुन भेट दिली
पुणे- फुले शाहु आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फौंडेशनच्या बहुउद्देशीय सत्यशोधक केंद्रास लिज्जत पापड चे सर्वेसर्वा मा. सुरेश कोतेसाहेब यांच्या विनंती वरून आज शनिवार दि.10 जुलै 2021 रोजी रात्री 10 वाजता लेखक गंगाधर भेंडेगावकर – संपादक साप्ताहिक जनसमुदाय, उदगीर ,लातूर यांनी खास आवर्जुन सदिच्छा भेट दिली.
यावेळी त्यांना अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी संस्थेच्या एकंदर कार्याविषयी तसेच गेल्या 3 वर्षात घटस्फोटीत, स्वजतीय , बीजवर, दिव्यांग ,व ब्राह्मणसह अंतरजातीय , अंतरराज्यीय,अंतरराष्ट्रीय आणि मंत्र्यांचे घरातील प्रथम नाशिक , असे एकुण 27 सत्यशोधक विवाह लावलेचे सांगितले. पुढे ढोक म्हणाले की नुकतेच दि.11 एप्रिल 21(महात्मा फुले जयंतीदिनी) ला या बहुउद्देशीय केंद्रातच अंतरजातीय सत्यशोधक विवाह व ऑनलाईन महात्मा फुले गीत चरीत्र प्रकाशन सोहळा तसेच दि.6 जून21रोजी (शिवराज्याभिषेक दिनी) विधवा- विधुर सत्यशोधक पुनर्विवाह लावल्याचे सांगून गेल्या वर्षी 19 जुलै 20 ला कोव्हिडं काळात प्रथमच ग्रामीण भागातील मासलगाव , सिन्नर ,नाशिक येथील पहिला सत्यशोधक विवाह लावला त्याच कुटूंबात 2 रा सत्यशोधक विवाह त्याच दिवशी म्हणजे दि.19 जुलै 21 रोजी विश्व विजया लॉन्स ,राहुरी फाटा ,ता.जि. नाशिक येथे नितीन जाधव व निकिता मोरे यांचा आमच्या संस्थेचे वतीने 28 वा सत्यशोधक विवाह लावणार असल्याची माहिती दिली.
या प्रसंगी हे सर्व कृतिशील कार्य तसेच सत्यशोधक विवाहाचे रजिस्टर नोंदणी मध्ये मंत्री व मान्यवर मंडळींच्या साक्षीदार म्हणून सह्या , सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र व इतर माहिती पाहून लेखक भेंडेगावकर म्हणाले की ढोक साहेब यांनी महात्मा फुले दाम्पत्याचा सत्यशोधक विवाह चळवळीचा वारसा अत्यंत प्रामाणिक पणे जपून महाराष्ट्र व महाराष्ट्राचे बाहेर तेलंगाणा राज्यात प्रथम जाऊन मोफत सर्व सत्यशोधक विवाह लावत आहेत हे कार्य नोकरी करून कसे सांभाळत असतील हे कोडे समजणे अवघड आहे. त्यांचे कार्य गेले अनेक वर्षांपासून ऐकून होतो पण मला आज लिज्जत पापड चे सुरेश कोते साहेबांनी आवर्जून भेट घेण्यास सांगितले आणि मी या केंद्रास भेट देऊन त्यांच्या कार्याने प्रभावित झालो आहे. पुढे ते असेही म्हणाले की ज्या प्रमाणे ढोक साहेबांनी लग्नचा 25 वा वाढदिवस पुन्हा एकदा सत्यशोधक पददतीने विवाह करून अपंगांना , गरजुना सायकली व कपडे ,ग्रंथ भेट देऊन साजरा केला तसेच त्यांनी नुकतेच दि. 12 जुन 21 रोजी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे(रजि.) अध्यक्ष डॉ.प्रल्हाद वडगांवकर यांचे देखील वयाचे 86 व्या वर्षी सत्यशोधक पददतीने विवाह नूतनीकरण केले त्याच प्रमाणे मी आपणाकडून पुढील महिन्यात आमचे पण सत्यशोधक विवाहाचे नुतनीकरण करून विधवा महिलांना साडी वाटप करूया आणि हा आदर्श नवीन पिढीला देऊन आपले कार्य लातूर जिल्ह्यात प्रथम सुरू करून जास्तीतजास्त सत्यशोधक विवाह लावण्याचा आपण एकत्र प्रयत्न करू या असे आश्वासन दिले.
यावेळी बहुउद्देशीय केंद्राचे संस्थापिका आशा ढोक यांनी असेच कार्य सातारा , वावरहिरे येथे सर्व आधुनिक सुविधा देऊन मोफत करीत असल्याचे देखील सांगितले.
यावेळी संपादक भेंडेगावकर यांचे महात्मा फुले गीत चरीत्र, ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले व थोर ऐतिहासिक शूर महिला ग्रंथ भेट देऊन अध्यक्ष सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी स्वागत केले. तर आभार आकाश ढोक यांनी मानले.