जत येथे शाहू शिक्षण संस्थेचा वर्धापन दिन साजरा
माणगंगा न्यूज जत:
-जतमध्ये शाहू शिक्षण संस्थेचा 41 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली.
यावेळी भाऊसाहेब जावीर बोलताना म्हणाले की, शाहू शिक्षण संस्थेची स्थापना 10 जुलै,1980 रोजी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी केले. सरांचा मुख्य हेतू होता की,बहुजनातील मुलांनी शिक्षणापासून वंचित राहू नये आणि शिक्षणाच्या प्रवाहात यावे.असे ध्येय उराशी बाळगून ढोबळे सरांनी एक रोपटं लावले होतं. त्याचा आज कल्पवृक्ष झाला आहे. आज संस्थेचा एवढा विस्तार वाढला आहे, की जवळपास 80 शाखा आहेत. त्यामध्ये एलकेजी, युकेजीपासून प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, ज्युनियर कॉलेज, सीनियर कॉलेज, आश्रमशाळा,वसतीगृहे, डीएड कॉलेज, बीएड कॉलेज, लॉ कॉलेज असा विस्तार संस्थेला झाला आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थित म्हणून जत नगरपालिकेचे माजी नगरसेवक परशुराम मोरे व डॉ. राहुल कोटी, सामाजिक कार्यकर्ते सिद्धू माने, आशा वर्कर, आरोग्य परिचारिका,प्रगल्भनायक न्यूजचे पत्रकार अनिल मदने उपस्थित होते. तसेच वस्तीगृहाचे अधीक्षक संजय कांबळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी कुमार स्वामीजी विद्या मंदिर विठ्ठलनगर जतचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वस्तीगह अधीक्षक, कर्मचारी उपस्थित होते.