डॉ.शंकर माने यांना कोव्हिड योद्धा पुरस्कार
नरवणे ( प्रतिनिधी)
नरवणे तालुका माण येथे खाजगी क्लिनिकच्या माध्यमातून सेवा देणारे डॉक्टर माने यांना नुकताच (सत्कार देवदूतांचा) कोवीड योद्धा पुरस्काराने मायणी येथे सन्मानित करण्यात आले .
हा पुरस्कार श्री.छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटी धारवड व मायणी पत्रकार संघ मायनी यांच्या वतीने देण्यात आला.कोरोना महामारी च्या काळात स्वतःला झोकून देऊन रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून रुग्णांना उपचार तसेच आधार देण्याचे काम या काळात बऱ्याच डॉक्टरांनी केले आहे
.अशांपैकीच एक हे माने डॉक्टर आहेत. त्यांनी कोरोना पॉझिटिव लोकांना शाब्दिक आधार, रोगा विरुद्ध लढण्यासाठी समुपदेशन, तसेच उपचार दिल्याने अनेकांचे प्राण वाचले आहेत, डॉक्टरी व्यवसाय हे व्रत योग्यपणे पेलण्याची गरज आहे. रुग्ण हा कोणत्याही परिस्थितीत बरा झाला पाहिजे हेच प्रत्येक डॉक्टरांचे ध्येय असावे असे डॉक्टर माने यांनी यावेळी बोलून दाखवले. या पुरस्काराने मला बळ आले आहे आणि प्रेरणा ही मिळाली आहे .यापुढेही हे व्रत मी ईमानाने पार पाडीन असेही ते यावेळी म्हणाले .
या कार्यक्रमास माण खटाव चे प्रांताधिकारी साहेब तसेच छत्रपती शिवाजी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. M. R. देशमुख साहेब, पोलीस प्रशासनाचे अधिकारी माननीय निलेश देशमुख तसेच गोसावी साहेब, मायणी चे तलाठी व पोलीस पाटील आणि मायनी पत्रकार संघाचे सन्माननीय पत्रकार तसेच इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.