मराठा समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न कराल तर भस्म ह्याल….नवीन वर्षाच्या सुरवातीला वडजल येथील बैठकीत मराठा एकिकरणाची हाक!
दहिवडी प्रतिनिधी :
कुकुडवाड, नरवणे, वडजल ,किरकसाल या गावाची बैठक प्रमुख मराठा कार्यकर्त्यांसह सवांद बैठक नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी वडजल येथे घेण्यात आली
या बैठकी मध्ये सर्व गावातील युवकांनी आपली मराठा समाजा बद्दल भूमिका मांडून
या पुढे मराठा सर्वच क्षेत्रात एकत्रित प्रगती करेल तसेच कुणबी नोंदी रेकॉर्ड तपासताना माण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेकॉर्ड नोंदी मिळत आहेत .प्रशासनाकडून नोंदी शोधण्याचे काम युद्ध पातळी वर सुरू आहे
माण तालुक्यातील मराठा समाजाने एकत्र यावे उद्योग व्यवसायात प्रगती करावी शिवाय मराठा समाजाचे फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कुठेही थारा देऊ नये असे. वक्तव्य विक्रम काटकर
यांनी व्यक्त केले
माण मधील दुष्काळाने होळ पणाऱ्या मराठा वर गेली अनेक दशके सर्व क्षेत्रातून अन्याय झाला व जो पर्यंत आरक्षण जो पर्यंत शेवटच्या व्यक्ती पर्यंत भेटत नाही तो पर्यंत ही मशाल समुद्राच स्वरूप घेईल असे मत गणेश काटकर यांनी व्यक्त केले
ज्यांच्या नोंदी सापडत आहेत अध्या लोकांनी माण सेतु विभागातून दाखले काढून घ्यावेत असे आव्हान करण्यात आले
यावेळी समन्वयक टीम चे राजू मुळीक , अप्पा देशमुख , श्रीकांत कट्टे , सोहम शिर्के , भाऊसो माने, बालाजी जगदाळे , सचिन जगताप , आकाश माने, उपस्थित होते