झरेतील मेंढपाळाची पोरगी उज्ज्वला बनली क्लास वन अधिकारी
आटपाडी प्रतिनिधी
झरे ता. आटपाडी येथील श्रीरंग टिंगरे या मेंढपाळाची पोरगी क्लास वन अधिकारी बनली ,अन् मेंढपाळाच्या कुटुंबाचं डोळ्याचं पारणं फिटलं. सर्वसामान्य कुटुंबातील उज्वला एकदम हलाकीच्या परिस्थितीमध्ये शाळा शिकून आई _बापाची गरिबी हटवण्याची मनात जिद्द बाळगून, रात्रंदिवस मेहनत करून आज ती क्लासवन अधिकारी म्हणून यशस्वी झाली. तिच्या या यशाने सर्वच थरातून कौतुक होत आहे व अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
पूर्वीपासूनच जिद्द चिकाटी मनामध्ये बाळगली होती त्याचे फळ मिळाले आणि आई बापाच्या डोळ्याचं पारणं फिटले.
कु.उज्वला हीची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत वर्ग 1 पदी निवड झाली आहे.उज्वलाचे शालेय शिक्षण ४थी पर्यंत जिल्हा परीषद प्राथमिक शाळा झरे व त्यानंतर माध्यमिक शिक्षण ज. ने. वी. झरे येथेच झाले आहे.
तिच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची असून वडील मेंढपाळ व आई मजुरी करते..परंतु अश्या परिस्थिती मध्ये देखील त्यांनी आपल्या ५ मुली व १ मुलगा यांचे शिक्षण थांबवले नाही. परिस्थिती हलक्याची असून कुटुंब मोठे असून सुद्धा उज्वलाच्या शिक्षणाला आई-वडिलांनी काही कमी पडू दिले नाही. स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला परंतु पोरीचे शिक्षण पूर्ण करायचं हा ध्यास आई-वडिलांनी मनात धरला होता .त्याला आज यश मिळाले.
उज्वालाच्या यशात तिचे आई वडील, भाऊ बहिणी सोबतच शालेय जीवनापासून लाभलेल्या सर्व शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. या उज्वलाच्या यशाने झरे व परिसरातून उज्जव लाचे कौतुक अभिनंदन होत आहे.