आटपाडी तालुक्यात उन्हाच्या झळा दुष्काळाच्या काळा सोसवेनात..
चाऱ्या-पाण्या अभावी मुक्या जनावरांचां हंबरडा,चारा डेपो सुरू करा
पिण्याच्या पाण्यासाठी 8 टँकर 7 गावांना, 46 वाड्या वस्त्यांना 33 खेपा सुरू.,
आटपाडी तालुक्याचा उन्हाच्या झळा दुष्काळाच्या कळा सोसवेना. सध्या तालुक्यामध्ये 6 खाजगी टँकर व 2 शासकीय टँकर 7 गावांना व 46 वाड्यावस्त्यांवर दररोज 33 खेपा पुरवल्या जात आहेत . पुढील काळात आणखी अनेक गावांमधून टँकरची मागणी येण्याची शक्यता आहे.
दुष्काळी कलंक कधी पुसणार टेंभूचे पाणी संपूर्ण गावाला कधी मिळणार सध्या दुष्काळामुळे शेतकरी कोकदम याला आला आहे पिण्याच्या पाण्याची टंचाई चाऱ्याची टंचाई जनावरे जगवायची तरी कशी असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यापुढे पडला आहे अनेक गावांमधून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत परंतु चाऱ्यासाठी चारा डेपो किंवा चारा छावणी अद्याप सुरू झाली नाही यामुळे शेतकरी जनावरांना चारा किती दिवस विकत घेणार आणि विकत घेतलेला चारा जनावराला किती दिवस पुरणार हाय गंभीर प्रश्न बनला आहे.
या तालुक्याची ओळख दुष्काळी तालुका म्हणून आहे. लहरी निसर्गाचा फटका या भागाला सातत्याने बसत आहे, पाऊसकाळ कमी असल्याने तालुक्याला सलग दोन तीन वर्षातून दुष्काळाचा फटका बसत आहे. यंदाही दुष्काळाच्या झळा बसू लागल्या आहेत बसताहेत .
तालुक्यामध्ये परंपरेनुसार जनावराचे संगोपन करून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर अनेक कुटुंब उदरनिर्वाह करीत आहेत. दुसरे कोणतेही उत्पनाचे साधन नसल्याने.शेती व जनावरांच्या जिवावर घरखर्च,शिक्षणाचा,दवाखाना, व इतर खर्च भागवावा लागतो.
निसर्गाच्या लहरपणामुळे सतत तीन-चार वर्षातून एकदा तरी मोठा दुष्काळ पडत असतो. त्याच पद्धतीने यावर्षीही दुष्काळाची झळ बसू लागली आहे.पाऊस पडला नसल्याने साठवण तलावे कोरडे ठणठणीत पडले आहेत. गवत उगवायचा प्रश्नच राहिला नाही.थोड्याफार पावसावर जे गवत उगवले ते सध्या उन्हाच्या तडाख्याने पूर्ण सुकून गेले आहे. त्यामुळे अनेक मेंढपाळ बांधवांनी चाऱ्याअभावी स्थलांतर केले आहे.
पाऊस नसल्याने विहिरींनी तळ गाठला आहे. तलावात पाणी नाही, त्यामुळे शेतीतून उत्पन्न निघाले नाही. शेतकऱ्यांनी स्वतः जगायचं की जनावरांना जगवायचं हा गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी चाऱ्या अभावी गाव सोडून स्थलांतर केले आहे.
जनावरांचे पोट भरायचे की स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक वेळा स्थलांतर करावे लागत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर निर्माण होत आहे. ज्या वेळेला स्थलांतर करावे लागेल त्या वेळेला शिक्षणासाठी मुले ठेवायची कुठे हा गंभीर प्रश्न असतो. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अनेक मेंढपाळांची मुलं शिक्षणापासून वंचित राहिलेली आहेत.
अनेक शेतकऱ्यांची मुलं थोडे फार शिक्षण घेऊन मुंबई पुणे या ठिकाणी मिळेल तो कामधंदा करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुढील पिढीवर सुद्धा शिक्षणाचा परिणाम होत आहे.
आटपाडी तालुक्याला टेंभू योजना ही वरदान ठरली आहे. परंतु या योजनेचे पाणी संपूर्ण शिवारात पोहोचले नाही. अनेक भागांमध्ये टेंभूचे पाणी बघायला सुद्धा मिळाले नाही. ठराविक मुख्य ठिकाणी टेंभूचे पाणी आले आहे. तालुक्यातील अनेक गावे टेंभू योजनेपासून वंचित आहेत, तर काही गावांमध्ये पाणी आले आहे. परंतु ते ओढ्यांनी तलावामध्ये आलेले आहे. या तलाव्यापासून कितीतरी लांब शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत, त्या जमिनीला पाणी न्ह्यायचे कसे ? हा गंभीर प्रश्न आहे.
टेंभू योजनाचे पाणी येणार आणि तालुका सुजलाम सुफलाम होणार या स्वप्नात शेतकरी गेली कित्येक वर्ष जगत आला आहे. तालुक्याचा उत्तर व पश्चिम भाग अजूनही पाण्यापासून वंचित आहे .तालुक्यातील या वंचित गावांना पाणी येणार कधी ?आणि जरी वंचित गावांना पाणी आले तरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी जाणार कधी ? हा एक गंभीर प्रश्न आहे.
सततचा दुष्काळ टेंभू योजनेचे चाललेले मंद गतीने काम, यामुळे शेतकरी वर्ग वैतागून गेला आहे. शेतीतून उत्पन्न निघत नाही, तर मग मुलांच्या शिक्षणाला पैसे आणायचे कुठून हा ही गंभीर प्रश्न आहे. त्यामध्ये स्वतः जगायचं की जनावरे जगवायची, की मुलांच्या शिक्षणाला पैसे खर्च करायचे, की मुलांच्या आरोग्याला पैसे खर्च करायचे हाही गंभीर प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. अनेक तरुणांचे शिक्षण निम्म्यावरती झाले आहे. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे पुढे शिक्षण घेऊ शकले नाहीत. अशा मुलांना नोकऱ्या सुद्धा मिळेनात अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पुढची पिढी शिक्षण घेणार की नाही ? हाही गंभीर प्रश्न आहे
शेतीतून उत्पन्न निघाले नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे बँकेचे हप्ते थकले आहेत…..
अनेक शेतकरी बँकेच्या थकबाकीच्या यादीत गेला आहे. तर शेतकऱ्यांची पत बँकेतून संपली आहे. शेतीतून उत्पन्न नसल्याने पूर्वीचे कर्ज न भरल्यामुळे पुन्हा बँक कर्ज देत नाहीत. त्यामुळे मुला मुलींची लग्न, स्वतः जगणे ,जनावरं जगवणे, दवाखान्याचा खर्च या सगळ्या गोष्टीला शेतकरी वैतागून गेला आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना सहा महिने आठ महिने गुरेढोरे घेऊन जगण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे.
अनेक तरुण मुंबई पुणे येथे मिळेल ते काम धंदा करून जगत आहेत .मिळणाऱ्या पगारांमध्ये स्वतःचच पोट भागत नाही. त्यामुळे भावंडांना बहिणींना शिक्षणासाठी पैसे देणार तरी कुठून ? हा ही गंभीर प्रश्न आहे .स्वतः जगायचं की कुटुंबाला जगवायचं हा ही तरुणांच्या पुढे प्रश्न पडलेला आहे.
जर टेंभू योजनेचे पाणी गावागावामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले तर आणि तरच शेतकरी शेतीतून उत्पन्न घेऊ शकेल. जनावरे जगू शकतील आणि त्यातून येणाऱ्या पैशातून मुलांचे शिक्षण करू शकेल, अन्यथा शेतकरी हा नावापुरताच….
असं म्हणले जाते शेतकरी राजा आहे. तर मग तो खरोखर कधी राजा होणार हाय का स्वप्नच राहणार आहे.
संपूर्ण तालुका ओलिताखाली आणण्यासाठी अनेक संघटनांचे आंदोलने चालू आहेत. परंतु टेंभू योजनेचे अगदी संत गतीने काम सुरू आहे. त्यामुळे या चार वर्षात तरी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येईल का नाही यामध्ये शंका आहे.
अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या परंतु प्रत्येक निवडणुकीमध्ये टेंभूच्या नावाचा जागर करण्यात आला. काम थोडे थोडे होत आहे .पण ते कधी पूर्ण होणार हा गंभीर प्रश्न आहे. विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, लोकसभा असो अशा अनेक निवडणुका टेंभूच्या नावाने निवडणुकीचा प्रचार होत आहे. परंतु प्रत्यक्षात योजना पूर्ण झाली नाही. परंतु अनेक संघटना अनेक राजकीय नेते टेंभू योजना पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करत आहेत .परंतु या प्रयत्नाला थोडे थोडे यश येत आहे. परंतु योजना लवकरात लवकर पूर्ण करून मेंढपाळांचे तरुणांचे व शेतकऱ्यांचे स्थलांतर थांबवावे अशी मागणी आपापल्या पद्धतीने शेतकरी ,कार्यकर्ते सर्व संघटनांना व राजकर्त्यांना साखडे घालताना दिसत आहेत.
लवकरच टेंभू योजना पूर्ण होईल असे सर्वच स्तरातून मग त्या संघटना असो राजकीय नेते असो यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ज्या वेळेला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत टेंभूचे पाणी जाईल त्याच वेळेला क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांचे स्वप्न पूर्ण झाले असे म्हणावे लागेल…
चौकट
टेंभू येण्याचे पाणी तालुक्यांतील संपूर्ण गावाला पोहोचले नाही .त्यामुळे अनेक गावे टेंभु पासून वंचित आहेत ज्या गावांना टेंभूचे पाणी गेले आहे त्या गावातील संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली आले नाही.तालुक्याने अनेक वर्षापासून दुष्काळाच्या झळा सोसले आहेत दरवर्षीच जनावरांच्या चाऱ्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे. उत्पन्नाचे साधन नाही घरची परिस्थिती नाजूक असल्याने अनेक तरुण मिळेल तिथे काम करून उपजीविका भागवत आहेत. त्यामुळे शिक्षणावर परिणाम होत आहे. परिस्थिती नसल्याने शिक्षण निम्म्यात सोडावे लागत आहे.
2… लोकसभा विधानसभा जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये टेंभूच्या नावाने मते मागितली जातात परंतु अद्याप टेंभूचे काम पूर्ण झाले नाही टेंभूचे काम पूर्ण झाले तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये मत कोणत्या मुद्द्यावर मागायचे हा पुढाऱ्या पुढे प्रश्न असल्याने संत गतीने टेंभूचे काम सुरू आहे.
चौकट … सध्या तालुक्यामध्ये सात गावांना व 46 वाड्यावर 6 खाजगी व दोन शासकीय टँकरद्वारे दररोज 33 खेपा पाणी पुरवले जाते. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने आणखी टँकर खेपा वाढण्य