वडूज ता. खटाव येथील ग्रामीण रुग्णालय, येथे 0 ते 18 वयोगटातील संदर्भित बालके व विद्यार्थी यांची राष्ट्रीय ग्रामीण स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत शस्त्रक्रिया पूर्व तपासणी करण्यात आली. यावेळी खटाव, माण, कोरेगाव व खंडाळा येतील मुलांनी तपासणीचा लाभ घेतला. ह्या शिबिरात सांगली येथील डॉ. तन्मय मेहता व डॉ. सचिन साळुंखे,डॉ.संतोष मोरे यांनी विद्यार्थ्यांची तपासणी केली. ह्या शिबिरात एकूण 55 विद्यार्थी उपस्थित होते.
हर्निया 5, Undescended Testis 3, Hydrocele 1, phimosis 13, Tongue Tie 4, Hypsospadiasis 9, CYST 5, इतर आजराचे 3 व हृदयविकार ,शुगर,बी.पी इ. आजाराचे मिळून 12 असे एकूण 55 विद्यार्थी उपस्थीत होते. सदर शिबिरातून शस्त्रक्रियेस पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांची लवकरच पुढील तपासणी करून शस्त्रक्रिया केल्या जातील.
हे शिबिर यशस्वी होण्यासाठी मा. जिल्हा शल्यचिकित्सक सातारा, मा. वैद्यकिय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय, वडूज. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्रीमती आसिया पट्टनकुडे तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे सर्व वैद्यकिय अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.