दहिवडी-मायणी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याने भागातील ग्रामस्थ समाधानी :- डॉ. दिलीप येळगावकर
मायणी:- सतीश डोंगरे
रस्ता हा आर्थिक विकासाचा कणा आहे. रस्ते व्यवस्थित असले तर वाहतूक व्यापार वाढतो,उद्योगधंद्यात वाढ होते . २०२०-२१ या कालावधीत मल्हारपेठ-पंढरपूर रस्ता मायणी पासून पुढे दोन पदरी दोन पदरी पूर्ण झाला परंतु मिरज भिगवण या राष्ट्रीय महामार्ग तील दहिवडी मायणी रस्त्यावर खड्डे झाले होते.यामुळे अनेक अपघात घडल्याने जीवित व वित्त हनिस प्रवाशांना सामोरे जावे लागत असल्याने आम्ही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेब यांची दिल्ली याठिकाणी भेट घेत त्यांना वस्तुस्थिती सांगितली.
या बाबीची तातडीने दखल घेऊन माननीय केंद्रीय मंत्र्यांनी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. व प्रत्यक्ष कामास सुरुवात होऊन आज दहिवडी ते मायणी या मार्गावरील डांबरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने माण व खटावचे ग्रामस्थ यरस्त्यावरून प्रवास करणारे वाहतूकदार,प्रवासी पूर्ण समाधानी झाले आहेत असे उद्गार डॉ. दिलीप येळगावकर यांनी दहिवडी- मायणी हा डांबरीकरण झालेला रस्ता लोकार्पण प्रसंगी अध्यक्षपदावरुन बोलताना काढले.
मायणी येथील चांदणी चौक याठिकाणी पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मायणी मेडिकल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम.आर.देशमुख हे होते.यावेळी सरपंच युवानेते सचिन गुदगे,उपसरपंच जगन्नाथ भिसे, आप्पासाहेब देशमुख, विजय कवडे, सुरज पाटील, जालिंदर माळी,यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना डॉ.येळगावकर म्हणाले की,जनतेने २०१६ साली मायणी ग्रामपंचायत ऐतिहासिक परिवर्तन करताना सत्ता आमच्याकडे दिली. या काळात आम्ही रस्ते ,नळ पाणीपुरवठा योजना ,रस्ते, गटारी केली असून जे ग्रामस्थांना पन्नास वर्षात भेटले नाही ते पाच वर्षात देऊन अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. विरोधकांनी आमचा जरूर विरोध करावा, पण विधायक कामात विरोध करू नये. आम्ही आमची विकासकामे घेऊन निवडणुकीत जनतेसमोर जाणार आहोत. त्यामुळे विरोधकांच्याकडून होणाऱ्या कोल्हेकुईला आम्ही भीक घालत नाही,असे सांगितले .
सदर वेळी गावातील पथदिव्याचेही उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले.
यावेळी बोलताना सरपंच युवा नेते सचिन ते म्हणाले पूर्वी चार-चार महिने नळाला पाणी गावातील ग्रामस्थांना मिळत नसायचे .आम्ही पिण्याच्या पाण्याची चांगली सोय केली आहे. तसेच सोलरवर नळपाणीपुरवठा योजना तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. तसेच दुर्मिळ असे “रामजी आंबेडकर स्मारक” आम्ही उभारणार आहोत.आशा अनेक समाजउपयोगी कामातून आम्ही या पाच वर्षांच्या कालावधीत लोकांची मने जोडण्याचे काम केले आहे.
याप्रसंगी राजाराम कचरे यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ग्रामपंचायतीने व खटाव माणचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी केलेल्या कामाचा आढावा घेतला. तर डॉ. देशमुख यांनी पाणीदार माजी आमदार कसे आहेत या विषयी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास बाबासाहेब देशमुख ,मोहन दगडे, नितीन पडळकर, विलास सोमदे ,संभाजी पाटोळे ,गणेश भिसे ,रघुनाथ माने ,दत्ता काबुगडे ,अनिल पाटोळे ,पांडुरंग झगडे ,कुमार देशमुख ,मज्जितभाई नदाफ,महादेव राजगे, सुरज जाधव ,गुलाब नदाफ, नितीन झोडगे ,दीपक देशमुख, अजिंक्य दूध उद्योग समूहाचे अध्यक्ष हिम्मतदादा देशमुख,
नितीन झोडगे यांनी सर्व मान्यवर , ग्रामस्थांचे आभार मानले.सदर वेळ भाजप शहराध्यक्ष जालिंदर माळी यांनी जिलेबी वाटून आनंद व्यक्त केला.