आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला महाराष्ट्र कामगार सेनेकडून दिलासा
शिव संपर्क अभियान महाराष्ट्र कामगार सेनेकडून सुरू: दिनकर पतंगे
माणगंगा न्यूज जत:
-महाराष्ट्र कामगार सेनेकडून जत तालुक्यातील वळसंग,कोळीगीरी, व्हसपेट, माडग्याळ, उटगी, लमाण तांडा, उमदी या गावांमध्ये महाराष्ट्र कामगार सेनेकडून शिव संपर्क अभियानास सुरुवात केली.
या गावात जाऊन कामगार सेनेचे पदाधिकारी यांनी शिवसेनेने केलेल्या कामाचा उल्लेख केला. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी केलेल्या कामाचा उल्लेख जनतेपुढे विचार मांडले.त्याचबरोबर भीतीमुक्त कोरोणा नियंत्रण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कोरोना होऊ नये म्हणून कोणती काळजी घ्यावी? आणि कोरोणा झाल्यानंतर कोणती काळजी घ्यावी ? याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.’माझा गाव कोरोना मुक्त गाव’ ही संकल्पना सर्वसामान्य जनते पुढे मांडली.
उमदी येथील आत्महत्या केलेले शेतकरी रमेश शेवाळेच्या नातेवाईकांना भेटून त्यांना कामगार सेनेकडून दिलासा दिला. तसेच शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करू आणि बँकेचे कर्ज आणि व्याज मुक्त करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न करू असे प्रतिपादन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष दिनकर पतंगे यांनी केले.
यावेळी कामगार सेनेचे तालुकाप्रमुख सुरेश घोडके यांनी कामगार सेनेने केलेल्या कामाचा आढावा दिला. यावेळी शिवसेना उपतालुका प्रमुख शिवाजी पडोळकर, अचकनहळळी शाखाप्रमुख अर्जुन भोसले, कोळीगीरी शाखाप्रमुख मोहन पोतदार उपस्थित होते. नजीकच्या काळात शेतकरी, शेतमजूर, विविध क्षेत्रात काम करणारे कामगार, सर्वसामान्य जनता यांचे प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र कामगार सेना कायम आपल्या पाठीशी राहील असे प्रतिपादन दिनकर पतंगे यांनी केले.