धिरेंनकुमार भोसले: “घुसमट”लघुपटास आंतरराष्ट्रीय पुरस्कार
प्रतिनिधी धिरेंनकुमार भोसले:
नाशिक येथे डीबीआर फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत खानदेश इंटरनॅशनल शाॅर्टफिल्म फेस्टीव्हल नाशिक २०२२ चा बेस्ट कन्सेप्ट पुरस्कार “घुसमट लाल रंगाची” या लघुपटास मिळाला.या लघुपटाच्या लेखिका सौ.सीमा दडस यांचे आयोजक नितीन भालेराव यांनी विशेष अभिनंदन केले.
या पुरस्कार समारंभास अभिनेता,दिग्दर्शक अमितकुमार बडगुजर(धुळे),मिसेस इंडीया इंटरनॅशनल श्रीलंका शिल्पा अवस्थी,अभिनेत्री,सिंगर,शिवसुंदरी नूतन मिस्त्री,अभिनेत्री शानी भावसार(इंदोर),अभिनेता अरुण सानप(जळगांव),डीओपी एडीटर प्रबीर अधिकारी उपस्थित होते.
या लघुपटात स्त्रीयांच्या मासिक पाळीसंबंधी विशेष लक्ष केले आहे.या काळात स्त्रीयांना मिळत असलेली वागणूक यांवर हा लघुपट सामाजिक जनजागृती करत आहे.
सातारा जिल्ह्यातील माण तालुका दुष्काळग्रस्तांचा जिल्हा म्हणून सर्वक्षृत आहे.या तालुक्यात पाण्याचा दुष्काळ असला तरी येथील युवक आणि महिला जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले नाव जगाच्या नकाशावर कोरतात.हा तालुका अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो.येथील कलाकार उत्साही व जिद्दी असल्याने ग्रामीण भाग असुनही येथील कलाकार शहरी भागातील कलाकारांपेक्षा चांगले सादरीकरण करताना दिसून आले आहेत.
या लघुपटाचे दिग्दर्शन अविनाश काटकर,सचिन कोळी,निर्मात्या सीमा दडस,कॅमेरामन अमोल कुलकर्णी,नितीन वाघमोडे तर कलाकार म्हणून डाॅ.अनिल दडस,सीमा दडस,मेहबुब मुल्ला,प्रकाश फासे,अमोल कुलकर्णी,धिरेनकुमार भोसले,अपेक्षा दडस,निकीता फासे,करिष्मा चव्हाण,अक्षय बोडरे,बाल कलाकार आर्ष कुलकर्णी यांनी काम केले आहे.